२८ व २९ नोव्हेंबरला जोगेश्वरी मध्ये मिशन कोकण साम्राज्य आयोजित “कोकणी बाजारपेठ”

0
10
२८ व २९ नोव्हेंबरला जोगेश्वरी मध्ये मिशन कोकण साम्राज्य आयोजित "कोकणी बाजारपेठ"
२८ व २९ नोव्हेंबरला जोगेश्वरी मध्ये मिशन कोकण साम्राज्य आयोजित "कोकणी बाजारपेठ"

२८ व २९ नोव्हेंबरला जोगेश्वरी मध्ये मिशन कोकण साम्राज्य आयोजित “कोकणी बाजारपेठ”

जोगेश्वरीकरांनो, तयार व्हा आपली कोकणी बाजारपेठ येत आहे.

मुंबई –
मुंबई आणि परिसरातील मराठी उद्योजकांना एकत्र आणणारी, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणारी आपली कोकणी बाजारपेठ आता जोगेश्वरीत येत आहे.
या बाजारपेठेत तुम्हाला विविध उद्योजकांची उत्पादने, खाद्यपदार्थ, कपडे, दागिने, घरगुती वस्तू आणि खरेदीसाठी अनेक पर्याय अनुभवता येतील.
पण ही बाजारपेठ केवळ खरेदीसाठी नाही, इथल्या प्रत्येक स्टॉलमागे एका उद्योजकाची मेहनत आहे, एका कुटुंबाचे स्वप्न आहे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द आहे.
आपल्याला ही बाजारपेठ मोठी करायची आहे, कारण आपल्या उद्योजकांना अधिक ग्राहक मिळावेत, त्यांच्या व्यवसायाला नवी ओळख मिळावी आणि मराठी उद्योजकतेला एक मजबूत व्यासपीठ मिळावे.
दिनांक : २८ व २९ नोव्हेंबर, २०२६
स्थळ : अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी रेल्वे स्टेशन जवळ, जोगेश्वरी – पूर्व.
वेळ : सकाळी ११.०० ते रात्री ९.००
नागरिकांनी कुटुंबीय व मित्र परिवारासह या कोकणी बाजारपेठेला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजक श्री. अजय आत्माराम यादव यांनी केले आहे.
मिशन कोकण साम्राज्य
कोकणी बाजारपेठ
मराठी व कोकणी उद्योजकांना उभं करण्याची चळवळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here