केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्याच्या २ दिवसाच्या दौऱ्यावर आले आहेत. भाजपचे निवडणूक प्रमुख श्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हा दौरा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आखण्यात आला असल्याचे सांगितले आहे. या दौऱ्याने आगामी काळातील निवडणुकीची रूपरेखा भाजपाला आखता येणार आहे असेही त्यांनी म्हंटले आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या या दौऱ्याचे आयोजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसही गोव्यात पोहचले आहेत.
या दौऱ्यामध्ये अमित शहा धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचा पायाभरणी मुहूर्त करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अधिकाऱ्यांसमवेत केंद्रीय प्रकल्पांचा आढावा देखील घेणार आहेत.
अमित शहा हे धोरणी राजकारणी असून येणाऱ्या निवडणुकीत सत्ताविरोधी आणि त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यानमध्ये आणखीन उत्साह आणण्यासाठी बैठक घेत आहेत. ही बैठक तळेगाव येथे होत असून या बैठकीला सर्व भाजप विधिमंडळ शाखा कार्यकर्ते आणिकोअर कमिटी उपस्थित असणार आहे. प्रामुख्याने सामान्य जनतेच्या अनुषंगाने राजकीय परिस्थितीचे आकलन करण्यासाठी हा दौरा असल्याने, या बैठकीसाठी सर्व भाजप कार्यकर्त्यांना बैठकीला बोलावण्यात आले आहे. त्याशिवाय अमित शहा भाजपच्या राज्य युनिटच्या मतावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच बघूया आता एका कुटुंबातील किती व्यक्तींना तिकीट द्यायचे या प्रश्नाला अमित शहा कसे सामोरे जातात असे सांगत नागरिकाने आपले मत व्यक्त केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मात्र भाजप उमेदवाराच्या गुणवत्तेवर उमेदवारी देतो असे सांगत हा प्रश्न टाळला आहे. गेल्या १० वर्षांपासून गोवा भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप ४० पैकी २१ जागांवर निवडून आले होते. मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर ज्यांच्याकडे बहुमत आहे याची खात्री करत उमेदवारांना चांगली पदे देत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. यावेळी पार्टी पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या शिवाय पण त्यांचा करिष्मा आणि राजकीय धोरणाने सुनिश्चित असलेल्या अशा गोव्यामध्ये निवडणुकीत उतरणार आहे


