प्रतिनिधी पांडुशेठ साठम
वैभववाडी ते कोल्हापूर जोडणाऱ्या गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १ कोटी रु. निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम सुरु असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज याठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली.यावेळी दर्जेदार काम करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदाराला दिल्या. सदर काम १ महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी व ठेकेदाराने दिली.
तसेच या रस्त्याच्या उर्वरित कामासाठी ३ कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. याप्रसंगी वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता नम्रता पाटील, स्थापत्य अभियंता शीतल कुमार सावंत, ठेकेदार शारदा कन्स्ट्रक्शन उपस्थित होते.


