CISCE म्हणजेच काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने ICSE आणि ISC बोर्डच्या 10 वी-12 वी सेमिस्टर 1 च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.CISCE च्या अधिकृत वेबसाइट cisce.org किंवा results.cisce.org वर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना एसएमएसच्या माध्यमातून देखील निकाल बघता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी 09248082883 या क्रमांकावर आपला सात अंकाचा यूनिक आईडी टाईप करून पाठवल्यास त्यांना आपला निकाल मिळू शकणार आहे.
cisce.org किंवा results.cisce.org या वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंक वर जावे आणि त्यावर क्लीक केल्यावर आपला सात अंकी यूनिक आईडी नंबर घातला कि विद्यार्थी आपला निकाल पाहू शकणार आहे.


