Alert: राज्यात 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव, रुग्णांच्या संख्येत वाढ

0
108

देशातील कोरोनाव्हायरसचं नवीन रुग्णांमध्ये गेल्या 2 दिवसात दुप्पट वाढ झाली आहे. तसेच महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या 103 वर पोहोचली आहे. देशभरात मंगळवारी 37,642 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 13 ऑगस्टनंतर हा सर्वाधिक आकडा आहे. देशात 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रात 288 तर केरळमध्ये 173 मृतांचा समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 34,169 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिचार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या 3,22,327 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या 24 तासांमध्ये सक्रीय रुग्णांमध्ये एकूण 2,776 रुग्णांची वाढ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर अर्थात कोरोना रिकव्हरी रेट सध्या 97.67% इतका आहे.

देशात आतापर्यत एकूण 4,35,758 लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात 1,36,355, कर्नाटकात 37,184, तमिळनाडुमध्ये 34,761, दिल्लीत 25,079, उत्तर प्रदेशात 22,794, केरळमध्ये 19,757 तर पश्चिम बंगालमध्ये 18,383 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये कोरोनाव्हायरसचा (Coronavirus latest update Kerala) पुन्हा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे.ओणम उत्सवानंतर केरळमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाल्याचं बोललं जात आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 24,296 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या 24 तासांत केरळमध्ये 65 टक्के नवे रुग्ण आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

देशाच्या एकूण रुग्णांच्या 65 टक्के नवे रुग्ण एकट्या केरळ राज्यात आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपालून कोरोना चाचण्या कमी होत आहे. तरी देखील केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दररोज 17,000 हूम जास्त नवे रुग्ण समोर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here