AUKUS मध्ये भारत आणि जपानला समाविष्ट करण्यास अमेरिकेचा नकार

0
90

अमेरिकेने इंडो-पॅसिफिकशी संबंधित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसोबत सुरक्षा करार केला होता.इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा करार आहे , परंतु अमेरिकेने भारत आणि जपानला या भागीदारीत समाविष्ट करण्यास नकार दिला आहे.

AUKUS मध्ये अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांची भागीदारी आहे. इंडो-पॅसिफिकच्या सुरक्षेसाठी भागीदारीमध्ये इतर कोणालाही समाविष्ट केले जाणार नाही असे व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन सासाकी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 24 सप्टेंबरला अमेरिकेत QUAD देशांची बैठक होणार आहे आणि QUAD मध्ये भारत आणि जपानचा समावेश आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पण या दोनही देशांना AUKUS मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.

QUAD (क्वाड) देशांमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांचा समावेश आहे. चीनने जगाशी केलेल्या व्यवहारात नवीन स्वैराचार दाखवल्यानंतर, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या चार मोठ्या लोकशाही देशांनी एक संगठन (QUAD) स्थापन केले आहे. त्यामुळे चीनसाठी एक प्रति- संगठन निर्माण झाले आहे. त्यामुळे “क्वाड” ला केवळ इंडो-पॅसिफिकच नव्हे तर जगभरात प्रचंड महत्त्व आहे.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनच्या AUKUS सुरक्षा भागीदारीमुळे चीन घाबरला आहे.अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या बांधण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अमेरिका आणि ब्रिटनसोबत एक सुरक्षा गट तयार केला आहे. ही युती इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असणार आहे.

AUKUS इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी ग्रुपमध्ये प्रवेश ही भारतासाठी एक मोठी संधी होती.त्यामुळे कदाचित भारतासाठी आण्विक सहकार्याचे नवीन मार्ग खुले होन्याची शक्यता होती.भारताला आतापर्यंत आण्विक सहकार्य फक्त रशियाकडून मिळते. परंतु आता अमेरिकेकडून AUKUS मध्ये भारताला समाविष्ट करण्यात येणार नाही असे सांगण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here