Bollywood: अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

3
75
Bollywood: अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सलमान खानला आठवड्याभरापूर्वी डेंग्यूची लागण झाल्याचे वृत्त होते. त्याला बरे वाटत नसल्यामुळे बिग बॉस च्या सीझनचाही होस्ट कारण जोहर करणार होता. सलमानला झालेल्या डेंग्यूमुळे मुंबई महापालिके त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये केलेल्या पाहणीत डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-नगरपरिषदेच्

महापालिकेकडून सलमानच्या अपार्टमेंटची पाहणी

मुंबई महापालिकेकडून सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या निवासस्थानाची म्हणजेच गॅलेक्सी अपार्टमेंटची पाहणी करण्यात आली. या पाहणीत महापालिकेच्या पथकाला अपार्टमेंटमध्ये दोन ठिकाणी डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या. यानंतर महापालिकेने सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये औषध आणि धूर फवारणी केली. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या आसपासच्या परिसरातही धूर फवारणी केली जात आहे. आजारपणातून बरा झाल्यावर सलमान पहिल्यांदाच आपल्या बहिणीच्या अर्पिताच्या घरी भाऊबीजेला गेला असल्याने तो निवास्थानी नसल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आरोग्य-विभागात-१०-हजार-प/

3 COMMENTS

  1. […] सीतरंग चक्रीवादळाने बांगलादेशात दाखल झाले आहे. या चक्रीवादळाने बांगलादेशात धुमाकूळ घातला आहे. याठिकाणी आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एएफपीने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने बरगुना, नरेल, सिराजगंजसह भोला बेट जिल्ह्यातील 35 लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती दिली आहे. प्रभावित भागातील हजारो लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्… […]

  2. […] मुंबई– अंगणवाडी ताईंचा दरवर्षीचा भाऊबीज मिळविण्याचा व मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होणार आहे. त्यांच्या मानधनात आता दोन-अडीच हजार रुपयांची मानधन वाढ प्रस्तावीत असून काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल. महिला व बालकल्याण विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्… […]

  3. […] वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला तपास आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे त्या आता पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्या महासंचालक पदासाठी पात्र ठरत नव्हत्या. https://sindhudurgsamachar.in/bollywood-अभिनेता-सलमान-खान-याच्… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here