Break The chain:18 वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड , पॅनकार्ड, शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक

0
104

राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ( Second Wave of Corona virus) ओसरत चालली आहे. कोरोना रुग्णांचा (Corona Patient) आकडा कमी होत असल्याने सरकारने (Maharashtra Government) अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. पण यामध्ये देखील सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सूट दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आज मॉलसाठी (Malls) नियमावली आखली आहे. आता राज्यातील मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. पण मॉल्समध्ये जाणाऱ्यांसाठी काही अटी घातल्या आहेत. राज्यातील 18 वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड (Aadhar Card), पॅनकार्ड (Pan Card), शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळ ख पत्र (School and College ID Card) दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे.

कोरोना निर्बधासाठी असलेल्या ब्रेक द चेन (Break The chain) अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने (Health Department) आज सुधारणा केली आहे. आरोग्य विभागाच्या या मार्गदर्शक सूचनांनुसार, ‘राज्यातील 18 वर्षांखालील मुला-मुलींच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात न झाल्याने 18 वर्षांखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक असणार आहे.

यासोबतच राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण (Corona Vaccination) आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे (Corona Vaccine) दोन डोस घेणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) आणि त्यासोबत प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवावे लागेल, असं देखील या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here