CNG गॅस किमतीत मुंबईत रविवार पासून रु.१=५० प्रति किलो ने दरवाढ

0
8
CNG गॅस किमतीत मुंबईत रविवार पासून रु.१=५० प्रति किलो ने दरवाढ
CNG गॅस किमतीत मुंबईत रविवार पासून रु.१=५० प्रति किलो ने दरवाढ

CNG गॅस किमतीत मुंबईत रविवार पासून रु.१=५० प्रति किलो ने दरवाढ

मुंबई ;
१४ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून मुंबई व एमएमआरडीए एरिया मध्ये महानगर गॅस ने दीड रुपयांनी भाव वाढवले आहे, आता सीएनजी गॅस रु.९१.५० प्रति किलो दराने मिळणार.
महानगर गॅसची ही या वर्षातील आठवी दरवाढ असून या वर्षभरात सीएनजी गॅस ११ रुपये प्रति किलो म्हणजेच १४ टक्क्याने ११ महिन्यात दर वाढला आहे.
जानेवारी २०२६ – रु.८०.५०
फेब्रुवारी २०२६ – रु.८१.००
एप्रिल २०२६ – रु.८२.००
मे २०२६ – रु.८४=०० नंतर रु.८६=००
सप्टेंबर २०२६ – रु.८८=००
ऑक्टोबर २०२६ – रु.८९=००
नोव्हेंबर २०२६ – रु.९०=००
१५ नोव्हेंबर २०२६ – रु.९१.५०
या दरवाढीमुळे अंदाजे एमएमआरडीए एरिया मध्ये १२ लाखाच्या वर सीएनजी वर धावणाऱ्या गाड्यांवरती आर्थिक बोजा वाढणार आहे ज्यात रिक्षा, टॅक्सी, प्रायव्हेट गाडी आणि खाजगी व सार्वजनिक बस यांचा समावेश आहे.
आखाती भागातील युद्धामुळे सीएनजीची खरेदी दर वाढल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे मुंबई विभागातील रिक्षांचे किमान दर २७ वरतून २९ रुपये प्रति १.५ किलोमीटर करण्यात यावी ही मागणी मुंबई रिक्षा युनियनचे थांपी कुरियन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here