गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा हळू हळू वाढू लागली आहे.इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही (ICMR) चिंता व्यक्त केली आहे.देशातील काही राज्यांमध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात त्यामुळं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असल्याचे सांगण्यात येत आहे.
आयसीएमआरने केलेल्या सर्व्हेक्षणात 6 ते 17 वर्षे वयोगटातील 50 टक्क्यांहून अधिक मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्या लसीकरण काळजीपूर्वक करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी वयोवृद्ध नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे लसीकरण होणं महत्त्वाचे आहे. राज्यांनी लागू केलेले लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याची घाई करु नये. तसेच मिझोराम आणि केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. केरळमधील कोरोनाग्रस्त रुग्ण हे अतिसंवेदनशील नागरिकांच्या संपर्कात येत आहेत.सध्या सणांचा काळ असून लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. तसेच नागरिकांकडून सार्वजणिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाहीये. आगामी काळत देखील या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत राहिली तर ती कोरोनाचा संसर्ग वेगाने पसवण्यास कारणीभूत ठरू शकते”असे म्हंटले आहे.