महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 22,122 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 592 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 42,320 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 55,79,897 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 88,620 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 56,02,019 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 3,27,580 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
