Covid 19:टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह चार जण पॉझिटिव्ह

0
84

भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोविड-19 चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे.यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे. त्यातच गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचाही कोविड-19 चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.

 “बीसीसीआयच्या मेडिकल टीमने काल संध्याकाळी प्रशिक्षक शास्त्री यांची रॅपिड लेटरल फ्लो टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवले आहे असे बोर्डाने अधिकृत निवेदन दिले आहे.ज्यांना कोरोनाव्हायरसची लक्षणे नाहीत अशा लोकांसाठी रॅपिड लेटरल फ्लो टेस्ट केली जाते. कोविड -19 ची लक्षणे असल्यास RTPCR चाचणी करणे आवश्यक असते.

जोपर्यंत वैद्यकीय टीमची पुष्टी होत नाही तोपर्यंत हे चौघेही टीम इंडियासोबत प्रवास करणार नाहीत. उर्वरित टीम इंडियाच्या सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या आहेत. एक काल रात्री आणि दुसरी आज सकाळी करण्यात आली. त्या सर्व सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याना ओव्हल येथे सुरू असलेल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here