Covid19:अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर

0
106

राज्य सरकारने कोरोना काळात लागू केलेले कडक निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे.राज्यातील प्रमुख शहरातील आणि जिल्ह्यातील मंदिर, शाळा, मॉल्स सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली. आहे. एकीकडे राज्यातील कोरोना अटोक्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असून कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

गेल्या 24 तासांत अहमदनगर जिल्ह्यात 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. अहमदनगर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.ज्या गावांमध्ये 10 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत अशा गावात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.या लॉकडाऊन दरम्यान मेडिकल, दवाखाने वगळता सर्व आस्थापनं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.28 टक्क्यावर पोहचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here