झायडस कॅडिलाने लहान मुलांसाठी कोरोनाची पहिली लस तयार केली आहे.या लसीचे 3 फेजच्या चाचण्या 1 हजार मुलांवर पूर्ण झाल्या आहेत. ही लस 12 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी बनविली आहे. झायडस कॅडिलाची लहान मुलांसाठी ही स्वदेशी लस आहे.एका वर्षात 12 कोटी डोस तयारी करण्याची योजना असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यासोबतच ही लस कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवरदेखील प्रभावी असल्याचे कंपनीने सांगितले. या कंपनीने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे मान्यता मागितली आहे. झायकोव्ह-डी ही लस देशातील पहिली ट्रिपल डोस लस असणार आहे. त्यामुळे देशातील मुलांना या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत.