राज्यातील करोना संसर्गाचा वेग कमी होत आला असला तरीही नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. परंतु करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात राज्यात १० हजार ५४८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ८ हजार ४१८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १७१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून एकमेकाला साहाय्य करावे. मास्क नियमित पणे वापरावे.मास्कमुळे कोरोनाचे संक्रमण ७०% रोखन्यास मदत होते.