Covid19:राज्यात दिवसभरात ९ हजार ३३६ नवीन करोनाबाधित

0
88

मागील काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आढळून येत होती.परंतु राज्यात आज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून आले आहेत.आज दिवसभरात राज्यात ९ हजार ३३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ३७८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.राज्यात आज १२३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

तसेच राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४८,६९३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,२३,०३० करोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. कोरोनाच्या महामारीने आपण सर्वच ट्रस्ट आहोत.पण या आजारावर मात करायची असेल तर सोशल डिस्टेंसिंग अत्यंत गरजेचे आहे. आपले आर्थिक गणित आधीच विस्कटलेले आहे.पुन्हा कॉरोनचा प्रकोप आपल्याला परवडणारा नाही.त्यामुळे स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here