Covid19: गोव्यात आज फक्त २३५ लोक कोविड पॉझिटिव्ह

0
108

गोव्यात आज फक्त २३५ लोक कोविड पॉझिटिव्ह मिळाले आहेत. त्यामुळे गोव्यामध्ये कोविडचा पॉझिटिव्हिट रेट १० % वर आला आहे.

गोव्यात आज २३५ लोक कोविड पॉझिटिव्ह मिळाले आहेत. पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.गेल्या २४ तासात २९३ लोक कोविडमुक्त झाले आहेत.त्यामुळे मृत्यूचा दर १०% पेक्षा कमी झाला आहे तर कोविडमुक्त होण्याचा रेट ९६.६% झाला आहे. ११ लोक आज रुग्णालयात भरती झाले असून तेवढेच लोक बरे होऊन घरी गेले आहेत.

शनिवारी ५ मृत्यू झाले असून त्यामुळे गोव्यातील एकूण कोविड मृतांची संख्या ३०३३ झाली आहे. या पाच पैकी ३ मृत्यू गोवा मेडिकल हॉस्पिटल मध्ये झाले असून २ मृत्यू हे साऊथ गोव्याच्या रुग्णालयात झाले आहेत. ४८ वर्षांच्या दाभोलीम येथील महिलेचा मृत्यू झाला असून तिला कोणताही इतर आजार नव्हता. रुग्णालयात दाखल झाल्याच्या पाचव्या दिवशी तिचा मृत्यू झाला आहे. बेनळीम रुग्णालयात मध्ये ७२ आणि ५२ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला आहे पण त्यांना दुसरे इतरही आजार असल्याचे सांगितले आहे. दोन ६० वर्षीय रुग्ण जे वालसोव आणि सांगोम येथील होते ते सागो रुग्णालयात दाखल झाले होते त्यांचाही मृत्यू कोरोना आणि इतर आजारांमुळे झाला असल्याची माहिती दिली आहे.

उत्तर गोव्यातील साखेळी केंद्रात आज सगळ्यात जास्त रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. यांची संख्या १३७ असून पेरवारींम,पणजी आणि कडोलिम येथे १०० रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here