जगात डेल्टा व्हेरिएंट आणि व्हायरस म्यूटेट झाल्याने कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोरोना लसीकरणामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत कोरोना रुग्ण कमी झाले होते.जगभरात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.मृत्यूंमध्येही पुन्हा वाढ होऊ लागली आहे. इंडोनेशियात 45%, ब्रिटनमध्ये 28%, अमेरिकेत 67%, स्पेनमध्ये 61% प्रकरणे वाढली आहेत.
भारतात कोरोनाचे निर्बंध कमी केले आहेत.बाजारपेठा उघडत आहेत.रेल्वे आणि हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.त्यामुळे भारतातही तिसरी लाट लौकरच येण्याची चिन्हे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.