देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत असलेला करोना विषाणू डेल्टा हा व्हेरिएंट होता. या व्हायरसचे डेल्टा आणि डेल्टा प्लस असे दोन व्हेरिएंट रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यात आता पुन्हा एका नव्या व्हेरिएंटची भर पडली आहे. कोरोना “कप्पा व्हेरिएंट” नावाच्या नव्या रूपात पुन्हा एकदा सापडत आहे. त्तर प्रदेश मध्ये कप्पा व्हेरिएंट संक्रमणाचे दोन रुग्ण मिळाले आहेत. येथिल स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण झालेल्या रुग्णांची ट्रवल्स हिस्ट्री तपासण्याचे काम चालू केले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट पेक्षा कप्पा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
आरोग्यव्यवस्था आणि सरकार दोन्ही आता करोनाच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी उचलत आहे. खोकला, ताप, अतिसार, चव गमावणे, घसा खवखवणे, श्वास लागणे यासारख्या लक्षणे देखील कप्पा व्हेरिएंटने संक्रमित झालेल्यांमध्ये दिसून येतात. त्यामुळे आपल्याला किरकोळ लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या स्ट्रेनचे नाव ग्रीक वर्णमालाच्या लेबलांवरुन दिले गेले आहे. यानुसार भारतात करोना व्हायरसच्या व्हेरिएंट स्ट्रेनचे नाव डेल्टा आणि कप्पा ठेवण्यात आले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट अन्य् व्हेरिएंटच्या तुलनेत 60 टक्के अधिक संक्रमण करणारा आहे. डेल्टा प्लसला बी.1.617.2 स्ट्रेन बोलले जाते तर, कप्पा व्हेरिएंटला बी.1.617.1 बोलले जाते. कप्पा व्हेरिएंट प्रकाराबद्दल बरेच संशोधन चालू आहे. या संशोधनामधून कप्पा व्हेरिएंटची अन्य् माहिती समोर येऊ शकते.