वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनामुळे 2020 मध्येही ही यात्रा रद्द केली होती.ही यात्रा 28 जून ते 22 ऑगस्टपर्यंत होणार होती. मधल्या काळात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर केल्या होत्या.भाविकांना ऑनलाइन दर्शन करता येणार आहे.
अमरनाथ अनंतनाग जिल्ह्यात आहे. काश्मीरच्या बालटाल आणि पहलगामपासून ही यात्रा सुरू होते. अमरनाथच्या गुफेत बर्फापासून नैसर्गित शिवलिंक तयार होते. तेथे जाण्याचा मार्ग अतिशय कठीण आहे. तरीदेखील सर्व समस्यांना तोंड देऊन दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात.