वेंगुर्ले तालुक्यात आज २ जुलै रोजी एकूण ३६ जणांचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी १, शिरोडा ३, वेळागर ५, सोन्सुरे ५, आरवली ३, मोचेमाड २, मातोंड ३,उभादांडा परबवाडा ३, वायंगणी कामतवाडी ३, वायंगणी नाईकवाडी १, वेतोरे १ व वेंगुर्ले शहर परिसरात ६ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह सक्रिय संख्या ४१७ इतकी आहे.