Covid19: सप्टेंबरनंतर लहान मुलांनाही मिळणार लस

0
107

देशात कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेचा (Third Wave) इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक धोकादायक असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र या लाटेपूर्वीच एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात लवकरच लहान मुलांचं लसीकरण (Vaccination of Children) सुरु होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात किंवा त्यांनंतर लगेच लहान मुलांचं लसीकरण (Children’s Vaccination) सुरु होण्याचे संकेत ICMR-NIVच्या संचालकांनी दिले आहेत.

“लहान मुलांवर लसीच्या (Vaccine For Children) चाचण्या झाल्या असून चाचण्यांचे रिझल्ट समोर येतील. त्यानंतर ते डीसीजीआयकडे याचा डेटा पाठवण्यात येईल आणि मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल” अशी प्रतिक्रिया आयसीएमआर-एनआयव्हीच्या (ICMR-NIV) संचालिका प्रिया अब्राहम यांनी दिली आहे.

“भारतातही कोरोनाचे (Covid19) दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लशीचा तिसरा बूस्टर डोस (Booster dose) घ्यावा लागू शकतो. काही देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जातोय. भारतातही अशा शिफारसी येत आहे. त्यामुळे भविष्यात बुस्टर डोसची गरज भासू शकते” असे प्रिया अब्राहम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मिक्स अँड मॅच लसी सुरक्षित असल्याचंही अब्राहम यांचं म्हणणं आहे. सीरमचे संचालक सायरस पुनावाला यांनीही नुकतेच पुण्यातील एका कार्यक्रमत बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here