Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
65

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 724 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 334 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 45 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 36 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 43 व्हेंटीलेटरव्हर 16 रुग्ण असून 2 मृत्यू झाले आहेत.

राज्यात आज दिवसभरा3 हजार 836 जण करोनामुक्त झाले असून,2 हजार 583 नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, 28 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here