Covid19: सिंधुदुर्ग जिल्हा कोवीड अपडेट

0
86

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 6 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 462 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 19 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 12 आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 22,व्हेंटीलेटरवर 9 रुग्ण असून 2 मृत्यू झाले आहेत.

राज्यात दिवसभरात १,४१० रुग्णांची नोंद झाली, तर १८  जणांचा मृत्यू  झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख जणांना संसर्ग झाला आहे. दिवसभरात १५२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ८९४ इतकी आहे. गेल्या २४ तासांत अहमदनगर १३२, पुणे जिल्हा १७०, पुणे शहर ८१, पिंपरी-चिंचवड ३७, सोलापूर ३३, सातारा ५३ अशी रुग्णनोंद झाली.

मुंबईत रविवारी करोनाच्या ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मागील रविवारी मुंबईत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर मात्र दिवसाला चार ते सहा मृत्यू होत आहेत. रविवारीही सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५३१ रुग्ण बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here