देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संक्रमितांपेक्षा जास्त राहिली आहे. शनिवारी कोरोनाची 41,463 प्रकरणे आढळून आली. या दरम्यान एवढेच म्हणजे 41,463 रुग्ण बरे झाले. यासोबतच 898 लोकांचा कोरोना संक्रमणामुळे शनिवारी मृत्यू झाला. अशाप्रकारे ऍक्टिव्ह म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 908 ने कमी झाली.
रिकव्हरीचे आकडे लक्षात घेतल्यास , दररोज सरासरी 40 हजार लोक बरे होत आहेत. अशा परिस्थितीत रविवारी बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.