बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
‘यास’ चक्रीवादळाची तीव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा जास्त असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.२५ मे आणि 26 मे रोजी ‘यास’ हे चक्रीवादळ ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर येऊन धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
भारतीय नौदलाच्या चार युध्दनौका आणि अनेक विमानं तयार ठेवली आहेत.फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची 17 पथके आणि ओडीआरएफच्या 20 बटालियन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.