यास चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे.झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे.झारखंडमध्ये सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.बुधवारी मध्यरात्री चक्रीवादळ झारखंडमध्ये प्रवेश करेल असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते कोलकाता आणि भुवनेश्वरची अनेक विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यात तीन येणाऱ्या आणि तीन जाणाऱ्या विमान उड्डाणांचा समावेश आहे.
झारखंडकडे जाताना यास चक्रीवादळाचे रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळातून आधी तीव्र चक्री वादळात होणार असल्यावे हवनखात्याने सांगितले आहे. त्यानंतरच्या सहा तासात म्हणजेच मध्यरात्रीनंतर चक्रीवादळाचा वेग कमी होईल.यावेळी याचा वेग साधारणपणे ताशी ६० ते ७० किलोमीटर इतका होणार आहे.
समुद्रकिनारी भागांतील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफ आणि इंडियन कोस्ट गार्डच्या टीम सतर्क आहेत. पश्चिम बंगाल ते ओडिशापर्यंत वेगवेगळ्या भागांत एनडीआरएफच्या टीमला मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती NDRFचे महासंचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे.