Desh-Videsh : अशोक लेलँडतर्फे ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये व्यावसायिक वाहन उद्योगाच्या भविष्याची झलक

0
20
अशोक लेलँडतर्फे ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये व्यावसायिक वाहन उद्योगाच्या भविष्याची झलक

कंपनीतर्फे वाहतुकीच्या शाश्वत पर्यायांचा समावेश असलेली उत्पादनश्रेणी सादर

दिल्ली – अशोक लेलँड ही हिंदुजा समूहाची प्रमुख भारतीय कंपनी आणि व्यावसायिक वाहनांची देशातील आघाडीची उत्पादक कंपनीने आज ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये वाहतुकीचे सात आधुनिक पर्याय सादर केले. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात कायमच आघाडीवर राहिली असून या एक्स्पोमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक व हायड्रोजन पर्यायांचा समावेश असलेली भविष्यवेधी वाहनांची श्रेणी सादर केली. http://sindhudurgsamachar.in/21-गन-सॅल्यूट-इंटरनॅशनल-कॉन/

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करण्यात आलेली उत्पादने पुढीलप्रमाणे –

1.       बॅटरी इलेक्ट्रिक वाहन

2.       फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहन

3.       हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन (आयसीई) वाहन

4.       लिक्विफाइड नैसर्गिक वायू वाहन

5.       इंटरसिटी सीएनजी बस

6.       मिनी पॅसेंजर बस

अशोक लेलँडचे कार्यकारी अध्यक्ष श्री. धीरज हिंदुजा पर्यायी उर्जेवर चालणारी उत्पादने सादर करतानाम्हणाले, ‘व्यावसायिक वाहन क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात अशोक लेलँड कायमच आघाडीवर राहिली आहे. या भविष्यवेधी आणि नाविन्यपूर्ण उत्पादन श्रेणीच्या माध्यमातून आम्ही परत एकदा तंत्रज्ञान क्षेत्रातील आमचे वर्चस्व आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीच्या हरित पर्यायांप्रती आमची बांधिलकी दर्शवली आहे. आमच्या नव्या हरित उर्जा उत्पादनांची श्रेणी ट्रक व बस अशा दोन्ही प्रकारांत सादर करण्यात आली असून त्यातून आमची क्षमता आणि रस्ते वाहतूक क्षेत्रात क्रांतीचे नेतृत्व करण्याची तयारी दिसून येते. आम्ही शाश्वततेबाबत आग्रही असून नव्या, व्यावसायिक वाहनांच्या मदतीने बाजारपेठेचे नेतृत्व करण्याची आमची आकांक्षा आहे.’

आपले मत व्यक्त करताना अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेनू अगरवाल म्हणाले, ‘ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये उत्पादने सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या दोन वर्षांत वाहन क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले असून हरित इंधन या क्षेत्राचे भविष्य आहे. देशातील सर्वोत्तम आर अँड डी टीम्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या टीमच्या मदतीने आम्ही यापुढेही नाविन्यावर भर देत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहन क्षेत्रात आघाडीवर राहायची महत्त्वाकांक्षा आहे. भारतातील पर्यायी उर्जा क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्याचे आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचे आघाडीचे पुरस्कर्ते बनण्याचे आमचे ध्येय आहे.’

वाहनप्रेमींसाठी ऑटो एक्स्पो आकर्षणाचे केंद्र असून उत्पादकांसाठीही ते चांगले व्यासपीठ आहे. तंत्रज्ञान देवाणघेवाणीसाठी योग्य असलेल्या या फोरममध्ये या क्षेत्रातील आर अँड डी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. भारतातील ७५ वर्षांचा अनुभव आणि मदतीसाठी 24×7 तत्पर असणारे पॅन भारत सर्व्हिस नेटवर्क, इन- हाउस विकास क्षमता यांसह अशोक लेलँडने उत्पादन श्रेणीचा विकास करण्याचे व वेगाने विकसित होत असलेल्या पर्यायी इंधन क्षेत्रात विस्तार करण्याचे ठरवले आहे.

१६ वा ऑटो एक्स्पो ११ ते १८ जानेवारी २०२३ दरम्यान इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट, ग्रेटर नॉयडा येथे भरवले जाणार असून अशोक लेलँडचा स्टॉल क्रमांक १२ व्या हॉलमध्ये एन15 आहे.

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अशोक लेलँडचे सादरीकरण पुढीलप्रमाणे असेल –

बॅटरी इलेक्ट्रिक व्हिईकल (बीईव्ही) – अशोक लेलँडचे बॉस बॅटरी इलेक्ट्रिक व्हिईकल हरित, शाश्वत जगासाठी खास तयार करण्यात आले असून संधींनी परिपूर्ण आहे. हे वाहन बॅटरीवर चालते, ज्यामुळे वाहनाला चालना देणाऱ्या मोटरला उर्जा मिळते. या वाहनात लिथियम इयॉन बॅटरी वापरण्यात आली आहे, जी बाह्य पद्धतीने चार्ज केली जाते. पेलोडला फायदा देण्यासाठी हे वागन हलक्या वजनाच्या डिझाइनसह तयार करण्यात आले आहे.

फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हिईकल (एफसीईव्ही) – अशोक लेलँडच्या फ्युएल सेल इलेक्ट्रिक ट्रकला हायड्रोजनद्वारे उर्जा मिळते. फ्युएल सेलमध्ये वातावरणातील ऑक्सिजन हायड्रोजनसह वीजनिर्मिती करतो व त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला उर्जा मिळते व पुढे मोटरला मिळून वाहनाला चालना मिळते. हे वाहन लिथियम इयॉन बॅटरी बाह्य चार्जिंग तरतुदीसह वापरत असल्यामुळे ते मर्यादित बॅटरी वाहन आहे. जास्त सुरक्षेसाठी या वाहनात गळती ओळखणारी यंत्रणा देण्यात आली आहे.

हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन व्हिईकल (एच२- आयसीई) – एचआयसीईव्ही- हायड्रोजन इंटर्नल कंबशन इंजिन वाहनाला अक्षय आणि हरित उर्जा स्त्रोत हायड्रोजनची जोड देण्यात आली आहे. या शाश्वत वाहनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून त्यामुळे सुरक्षित व स्मार्ट भविष्याच्या दिशेने प्रवास सोपा होईल. एच२-आयसीई पारंपरिक कंबशन इंजिनसारखे आहे आणि हायड्रोजनवर चालण्यासाठी त्यात थोडेसे बदल करण्यात आले आहेत. या वाहनाला अतिरिक्त वाहन आणि रस्ते सुरक्षेसाठी एडीएएस (अडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम) देण्यात आली आहे.

लिक्विफाइड नॅचरल गॅस व्हिईकल (एलएनजी) – अशोक लेलँडने अनोखे ड्युएल- फ्युएल वाहन उपलब्ध केले आहे. द्रव स्वरुपातील नैसर्गिक वायूवर चालणारे हे वाहन एलएनजी आणि सीएनजीवर चालते. यातील स्मार्ट आणि शाश्वत इंधन यंत्रणा आपल्या स्मृद्ध आणि हरित भविष्याकडे घेऊन जाईल. लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वाहन गॅसोलाइन- पॉवर्ड वाहनाप्रमाणे स्वार्क इग्नायटेड इंटर्नल कंबशन इंजिनप्रमाणे काम करते. नैसर्गिक वायू अती प्रमाणात थंड केला जातो आणि ट्रकवर लावण्यात आलेल्या टाकीत द्रव स्वरुपात क्रायोजेनिक पद्धतीने साठवला जातो. एलएनजीचा वापर प्रामुख्याने अवजड वाहनांत दीर्घ पल्ल्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो.

एफसीईव्ही, एच२-आयसीई आणि एलएनजी एव्हीटीआर मोड्युलर व्हिईकल प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले असून त्यामध्ये यशस्वीपणे चालणाऱ्या, कार्यक्षमता सिद्ध केलेल्या सध्याच्या डिझेल वाहनांपासून सर्व प्रमुख वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत.

इंटरसिटी कंप्रेस्ड नॅचरल गॅस बस (१३.५ सीएनजी बस) – अशोक लेलँडची १३.५ एम इंटरसिटी सीएनजी बस (4X2) ही या क्षेत्रातील सर्वात लांब बस असून भारतातील सर्वात ताकदवान टर्बो चार्ज्ड सीएनजी इंजिनवर चालते. या वाहनामध्ये १५०० लीटर्स (२५५किलो) सीएनजी इंधन हलक्या वजनाच्या कंपोझिट सिलेंडर्समध्ये साठवले जातेजे फ्रेमवर सुरक्षितपणे ठेवले जाते व त्याची रेंज १००० किमी आहे. १३.५ एम बसमध्ये ११ क्युबिक मीटर्सचे सीएनजी बसेसमधील सर्वात मोठी लगेज स्पेस असून त्यात ३६ बर्थसह २० टक्के जास्त प्रवासी क्षमता आहे.

बडा दोस्ट एक्सप्रेस (कंप्रेस्ड नॅचरल गॅस- सीएनजी) – बडा दोस्त एक्सप्रेस ही मिनी पॅसेंजर बस पर्यावरण, आरामदायीपणा आणि कामगिरीला प्राधान्य देणारी आहे. अत्याधुनिक इंजिन लाभलेले हे वाहन शहरी तसेच हायवे ड्रायव्हिंगसाठी योग्य आहे. १२ प्रवासी क्षमता असलेली बडा दोस्त एक्सप्रेस प्रवाशांना जास्त आराम आणि सहजपणे चढण्या- उतरण्याची सुविधा देते. ग्रॅब रेल्स, सेफ्टी हँड्लस आणि अँटी स्किड फ्लोअर्समुळे पॅसेंजर सलूनमध्ये चालणे सोपे व सुरक्षित झाले आहे. एसी आणि व्हिइकल ट्रॅकिंग सिस्टीमच्या (व्हीटीएस) पर्यायी वैशिष्ट्यांमुळे बडा दोस्त एक्सप्रेस नफ्यासह दर्जेदार कामगिरी देणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here