Desh Videsh: स्विच मोबिलिटीकडून स्मार्ट सिटीमध्ये दळणवळणासाठी स्विच EiV ७ चे ऑटो एक्सपो २०२३ मध्ये अनावरण

0
43
स्विच मोबिलिटी कडून स्मार्ट सिटी मध्ये दळणवळणासाठी स्विच EiV ७ चे ऑटो एक्सपो २०२३ मध्ये अनावरण

स्विच EiV ७ चे अनावरण भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

· स्विच EiV ७ हे मेट्रो फीडर, कार्यालयीन कर्मचारी वाहतूक सेवा, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतुक सेवा आणि कॅम्पस शटल यांसारख्या विविध विशेष गरजांची पूर्तता करण्यासाठी बनविले आहे.

· स्विच EiV २२ हे खुले छत (ओपन टॉप) असलेले डबल डेकर सुद्धा या वेळी प्रदर्शित केले जात आहे. 

· स्विच चे प्रदर्शनातील स्टँड हे ग्रेटर नोएडा येथील एक्सपो ग्राउंड वर हॉल क्रमांक १२, स्टॉल क्रमांक N १५ मधील अशोक लेलँड सह सर्वसमावेशक स्टँड चा एक भाग आहे.

ग्रेटर नोएडा:  हिंदुजा समूहाची एक कंपनी आणि पुढील पिढीसाठी कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस व हलके व्यावसायिक वाहन उत्पादक  स्विच मोबिलिटी लिमिटेड (SWITCH) ने ऑटो एक्सपो २०२३ मध्ये स्विच EiV ७ चे अनावरण केले. भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट सिटी मध्ये दळणवळणासाठी तांत्रिक दृष्ट्‍या प्रगत अशा इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन झाले. सध्याच्या EiV मालिकेला बळकटी देत नवीन स्विच EiV ७ ला मेट्रो फीडर्स द्वारे शेवटच्या टप्प्यापर्यंतची कनेक्टिव्हिटी, कार्यालयीन कर्मचारी वाहतूक सेवा, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतुक सेवा आणि कॅम्पस शटल  अशा शहरी नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खास करून बनविले आहे. या व्यतिरिक्त, स्विच त्यांच्या खुले छत असलेल्या ओपन टॉप डबल डेकर स्विच EiV २२ देखील प्रदर्शित करीत आहे. हे भारतातील पहिले इलेक्ट्रिक डबल डेकर आहे.

स्विच मोबिलिटी लिमिटेड (SWITCHचे कार्यकारी अध्यक्ष श्रीधीरज हिंदुजा म्हणाले, “स्विच मोबिलिटीची यूके आणि भारतीय बाजारपेठेत बस विभागामध्ये प्रमाणित आणि मजबूत परंपरा आहे. व्यावसायिक वाहन विभागातील आमचा समृद्ध इतिहास आम्हाला ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वदेशी, नावीन्यपूर्ण आणि कल्पक तंत्रज्ञान प्रदान करण्यास मदत करतो. भारतातील बाजारपेठेत पदार्पण केल्या नंतर अल्पावधीतच अगदी मजबूत बनलेले आमचे ऑर्डर बूकच ग्राहकांचा आमच्या ब्रॅंड वरील विश्वास आणि निष्ठा दाखविते. स्वच्छ व उत्सर्जन मुक्त शहरांसाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक बदलांसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि नवीन कल्पना आणण्यासाठी आम्ही काम करीत राहू.”

स्विच मोबिलिटी लिमिटेड (SWITCH) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. महेश बाबू म्हणाले, “भारतीय इलेक्ट्रिक बस बाजारपेठेत टिकाऊपणा, कमी खर्च आणि शाश्वतता यामुळे खासगी ऑपरेटर विशेष रस व उत्सुकता दाखवित आहेत. EiV मालिकेतील आमच्या नवीन स्विच EiV ७ चे अनावरण होताना आम्हाला फार आनंद होत आहे, जी देशातील शेवटच्या ठिकाणापर्यंत दळणवळणाची सेवा देण्यामध्ये आणि कर्मचारी व शालेय वाहतूक कामांमध्ये क्रांति घडवून आणेल. स्विच EiV ७ हे आधुनिक आणि प्रगत अशा बांधणीवर बनविलेले असून ते अधिक वाढलेल्या कार्यक्षमतेने आणि उत्कृष्ट कामगिरीने भारतातील स्मार्ट सिटी मधील प्रवास जास्त सक्षम करेल. तसेच, एक्सपो मधील आमचे दुसरे शोकेस म्हणजे नूतनीकरण केलेले प्रतिष्ठित असे डबल डेकर स्विच EiV २२ हे पर्यटनावर प्रभाव निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे आणि शहरांतर्गत बसेस च्या बाजारपेठेत हे नवीन मानके स्थापित करेल. आमच्या तांत्रिक कौशल्याचा फायदा घेऊन आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा देत राहू.”स्विच EiV ७ हे ग्राहक केंद्रित आणि प्रवाश्यांना आरामदायी होईल असे तंत्रज्ञान प्रदान करते -जसे उंचीने खाली असलेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here