Directorate of Revenue Intelligenceचा मुंबईत मोठा छापा; १३९ कोटींच्या अक्रोड आयात शुल्क घोटाळ्याचा पर्दाफाश

0
44

मुंबई : Directorate of Revenue Intelligence (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई करत अक्रोड आयात शुल्क चुकवेगिरीच्या तब्बल १३९ कोटी रुपयांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गुजरातमधील Deepak Trading Company या कंपनीचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

गुप्त माहितीनुसार, संबंधित कंपनी चिलीमधून न्हावा शेवा बंदरात कवचासहित अक्रोड कमी मूल्य दाखवून आयात करत होती. या प्रक्रियेत मूलभूत सीमा शुल्क आणि आयजीएसटी (IGST) चुकवले जात असल्याचे उघड झाले आहे. आयातदारांच्या मागणीनुसार कमी मूल्याची बिले तयार करून दिली जात होती.

तपासादरम्यान असे आढळून आले की, चिलीमधील मूळ पुरवठादाराची खरी बिले सादर न करता, United Arab Emirates (यूएई) येथील तृतीय पक्ष कंपन्यांच्या बनावट बिलांचा वापर करण्यात येत होता.

डीआरआयने सखोल शोधमोहीम राबवून पावत्या, निर्यात कागदपत्रे आणि व्यवहारांचे विश्लेषण केले. त्यातून तब्बल १३९.७४ कोटी रुपयांचे शुल्क चुकवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणात यूएईतील एका फर्मने ‘दीपक किराणा स्टोअर्स’, ‘दीपक ट्रेडिंग कंपनी’ आणि ‘एंजल एंटरप्रायझेस’ या तीन आयातदारांना कमी मूल्याच्या पावत्या पुरवल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here