Election निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांवर कारवाई; राज्य निवडणूक आयोगाचा इशारा

0
81
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्यांवर कारवाई; राज्य निवडणूक आयोगाचा इशारा

मुंबई l प्रतिनिधी

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असून, याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळात मतदान, मतमोजणी व इतर प्रक्रियांमध्ये कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. त्यामुळे सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर प्रशिक्षणास उपस्थित राहावे, अन्यथा नियमांनुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here