Goa: मास्टर ऑफ लाइन, वामोन नवेलकर यांचे निधन

0
99
मास्टर ऑफ लाइन मॅन काल काळाच्या पडद्याआड गेले. गेल्या दोन वर्षांपासून नवेलकर यांना ऐकू येत नव्हते आणि ते जास्त बोलतही नव्हते.परंतु अजूनही त्यांचे चित्र काढणे थांबले नव्हते.अगदी मृत्यूच्या आधीही  वयाच्या ९१ व्या वर्षीही ते चित्र काढत होते.

सोमवारी त्यांनी दोना-पौला येथील एका खासगी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. त्यांच्यावर त्याच दिवशी अंतिम संस्कार करण्यात आले. जगातल्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कलाकृती खाजगी आणि सार्वजनिक संकलनाचा भाग बनल्या आहेत. वय झाल असूनही चित्र काढताना,ते रेखाटताना मी तल्लीन होऊन जातो.मला असणारे त्रास मी पूर्ण विसरून जातो.मनातले निगेटिव्ह विचारही निघून जातात असे त्यांनी सांगितले होते.

नवेलकरांनि १९६० मध्ये आशिया ते यूरोप आणि आफ्रिकाची काढलेली जलरंगातील चित्र अतिशय सुंदर आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील मोठा काळ हा पोर्तुगाल मध्ये घालवला. ते जेव्हा गोव्यात परतले तेव्हा चित्रकारांचे असे काही गट नव्हते.त्यामुळे त्यांना कुणी आपल्यात सामावून घेईल असे वाटले नव्हते पण सगळ्यांनीच त्यांच्यावर  भरभरून प्रेम केलं असे आर्टिस्ट योलांडा डिसोझा यांनी सांगितले.डिसोझा यांनीच नवेलकरांचे पहिले चित्र प्रदर्शन भरवलं होतं.

आश्लेय फर्नांडीस आणि रोनाक कामत यांनी नावेकर यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनविली होती.  त्यांनी त्यांना या डॉक्युमेंटरीचे नाव काय ठेऊया असा विचारलं.त्यावर नवेलकरांनी I'm Nothing असे नाव ठेवा असे सांगतिले. त्यांना मुलांना शिकवणे आवडत असे. त्यांच्यावर सगळ्यांनी प्रेम केलं पण त्यांना फक्त काहीजणांनीच समाजून घेतल होतं.ते जगभरात प्रसिद्ध होते पण गोवा राज्याकडून त्यांच्या कलागुणांचे उचित मोल झाले नाही. त्याची त्यांना खंत राहिली. पण त्यांच्या अभिजात चित्रानी ते सर्वांच्याच मनात कायम स्टील आणि त्यांचे नाव अजरामर राहील असे आश्लेय म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here