गोवा इन्स्टिटयूट मॅनेजमेंट, रायबंदर येथील बिल्डिंगच्या काही भागात आयुष हॉस्पिटलसाठी जागा देण्याचे गोवा सरकारने ठरविले आहे. गोवा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्याबरोबर आयुष्य रुग्णालयासाठी जागा ठरविण्यासाठी मिटिंग घेतली होती. तसेच या संबंधातील सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता करून शक्य तेवढ्या लौकर रुग्णालय सुरु करून लोकांना त्याचा कोविडच्या संसर्गामध्ये आधार मिळावा असेही सांगितले. गोवा इन्स्टिटयूट मॅनेजमेंटची इमारत गोवा सरकारने ३० वर्षांच्या भाडेकराराने १०० रुपये प्रति चोऊ.फूट या दराने भाड्याने दिली आहे