Kokan:चेंदवण,कवठी गावातील शिवसेनेचे अतुल बंगे यांनी घेतले गणपती दर्शन

0
55
शिवसेनेचे अतुल बंगे यांनी घेतले गणपती दर्शन
शिवसेनेचे अतुल बंगे यांनी घेतले गणपती दर्शन

आमदार वैभव नाईक पालकमंत्री व्हावेत असे चेंदवण,कवठी भागातील ग्रामस्थांनी गणरायाकडे घातले साकडे!

कुडाळ- मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक हे २०२४ ला लोक आमदार म्हणून निवडून देतीलच मात्र सर्व सामान्य जनतेच्या मनात पालकमंत्री व्हावेत हीच इच्छा असुन गणपती नक्कीच पावणार अशी भावना चेंदवण कवठी गावातील लोकांनी व्यक्त करत गणरायाकडे साकडे घातले आहे.https://sindhudurgsamachar.in/goa-1-92-कोटींची-बेहिशोबी-मालमत/

शिवसेनेचे अतुल बंगे सध्या संपुर्ण भागात गणेश दर्शन घेत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क आणि विकास कामे करुन शिवसैनिक आणि सामान्य जनतेशी जुळवलेली नाळ या मुळे कार्यकर्ते जोमाने काम करताना चे चित्र दीसत आहे. श्री बंगे गावात गेल्यावर असंख्य शिवसैनिकांची टीम एकत्रित होऊन घरोघरी गणेशाचे दर्शन घेत आहेत.

गावा गावात असलेला उत्साह पाहता येत्या २०२४ ची विधानसभआणि लोकसभा ही खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची नांदी आहे असे समजले जात आहे. चेंदवण शिवसेना शाखा प्रमुख किरण कोचरेकर,कवठी युवक मंडळ मा अध्यक्ष संजय करलकर,कवठी जेष्ठ शिवसैनिक एकनाथ बांदेकर, शिवसेना नेरुर उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, उपसरपंच ऋृतुजा खडपकर, कवठी मा उपसरपंच अरुण परुळेकर,यांनी तर गणरायाकडे आमदार वैभव नाईक पालकमंत्री व्हावेत असे साकडे घातले आहे यावेळी कवठी तंटामुक्त अध्यक्ष सदानंद बांदेकर यांचे अभिनंदन करत गणेश दर्शन घेतले यावेळी रुपेश खडपर, एकनाथ बांदेकर, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here