Kokan: अर्नाळा हेल्थ ट्रस्ट,श्री महालक्ष्मी हॉस्पिटलच्या वतीने डॉ दीपक ठाकूर यांचा सत्कार

0
87
अर्नाळा हेल्थ ट्रस्ट,श्री महालक्ष्मी हॉस्पिटलच्या वतीने डॉ दीपक ठाकूर यांचा सत्कार
अर्नाळा हेल्थ ट्रस्ट,श्री महालक्ष्मी हॉस्पिटलच्या वतीने डॉ दीपक ठाकूर यांचा सत्कार

वेंगुर्ला- अर्नाळा हेल्थ ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी हॉस्पिटल च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालूक्यातील सेवाभावीवृत्तीने पाट म्हापण सारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय मदत करणारे फॅमिली डॉ दीपक ठाकूर यांचा २१ जानेवारी रोजी अर्नाळा हेल्थ ट्रस्टचे श्री महालक्ष्मी हॉस्पिटल या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभत गौरवीण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अ-भा-मराठी-नाट्य-संमेलन-प/

सदर समारंभ २१ जानेवारी, २०२४ रोजी संध्याकाळी ४.०० वा. श्री महालक्ष्मी हॉस्पिटल, संस्थान श्री राम मंदिर समोर, अर्नाळा, विरार (प), ता. वसई, जि. पालघर, येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने समाजातील महनीय व्यक्तींनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व धनादेश बहाल करुन, विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या निमित्ताने “रौप्यमहोत्सवी” गौरव अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here