Kokan: घुमटेश्वर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

0
49
घुमटेश्वर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
घुमटेश्वर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा – नवाबाग येथील श्री घुमटेश्वर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-नेत्र-रुग्णाच्या-डोळ्या/

दि. ५ जानेवारी रोजी नवाबागवाडी मुख्य रस्त्यापासून ग्रामदेवता पाषाण मूर्ती व कलशाची सवाद्य मिरवणूक, या मिरवणूकीत कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळाचे दिडी भजन, सायं. ५ वा. राक्षोघ्न होम, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून धार्मिक विधी, सायं. ६ वा. महाआरती, ७ वा. ब्राह्मण प्रासादिक मंडळ भेंडमळा यांचे भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.शरदबुवा घाग (नृसिहवाडी) यांचे ‘भक्त हरिपाल‘ यावर किर्तन, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून धार्मिक विधी, सायं. ४ वा. सक्राळ-गोवा येथील ब्राह्मण घुमट आरती भजन मंडळाची घूमट आरती, सायं. ६ वा. महाआरती, सायं. ७ वा. केपादेवी प्रासादिक मंडळाचे वारकरी भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.दत्तात्रय उपाध्ये (वालावल) यांचे ‘रूक्मिणी स्वयंवर‘ यावर कीर्तन, दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. ह.भ.प.हरेकृष्ण पोळजी महाराज (आसोली) यांच्या हस्ते ‘शिखर कलश प्रतिष्ठापना‘, १०.४६ मि. या शुभमुहूर्तावर श्री देव घुमटेश्वर देवता स्थापना, देवतेची प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, धार्मिक विधी, नैवेद्य, आरती, महाप्रसाद, सायं. ६ वा. महाआरती, सायं. ७ वा. मुळपुरूष धावडेश्वर मंडळाचे वारकरी भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.शरदबुवा घाग (नृसिहवाडी) यांचे ‘श्रीराम गंगापार‘ यावर कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्याव असे आवाहन श्री देव घुमटेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान स्थानिक सल्लागार समिती आणि समस्त नवाबागवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here