Kokan: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गतर्फे समस्या सोडविण्यासाठी15 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
83
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्गतर्फे समस्या सोडविण्यासाठी15 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गनगरी, : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरनारी, वीरमाता वीरपिता यांच्या महसूल विभागासंबंधीत व इतर प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-त्रिंबक-गावची-वार्षिक-डा/

या बैठकीमध्ये माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत, विशेषत:महसूल विभागाशी संबंधित भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात सविस्तर विचार विनीमय करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे, अशा सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवापत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांनी त्यांच्या महसूल विभाग संदर्भातील समस्या व इतर काही प्रलंबित अडीअडचणी असल्यास सदर प्रकरणांचा लेखी अर्ज व सर्व कागदपत्रासह, यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.02362 228820 वर संपर्क करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here