Kokan: पर्यावरण दिनी सायकल रॅली व वृक्षांची लागवड

0
17
पर्यावरण दिनी ,
पर्यावरण दिनी सायकल रॅली व वृक्षांची लागवड

वेंगुर्ला प्रतिनिधी- हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड, प्लॅस्टीकचा अतिवापर आणि जैवविविधतेचा -हास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्ष ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आज बुधवारी सायकल रॅली व शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. https://sindhudurgsamachar.in/kokan-भिकाजी-साटेलकर-यांचे-निध/

      सकाळी नगरपरिषद कार्यालय ते दाभोली नाकाशिरोडा नाकाबॅ.नाथ पै रोडपॉवर हाऊसकॅम्पम्हाडा वसाहतजलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत सायकलींवर पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर संदेश लिहिलेले फलक लावण्यात आले होते. त्यानंतर  गोळीबार मैदान येथे देशी प्रजातींच्या अंदाजे १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. मुख्याधिकारी परितोष कंकाळप्रशासकीय अधिकारी संगिता कुबलवेंगुर्ला सायकल ग्रुप वेंगा बॉईजचे डॉ.प्रल्हाद मणचेकरनित्यानंद आठलेकरविश्राम घाडीसंदिप परब यांच्यासह नागरिकनगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना झाडाचे रोप भेट देण्यात आले.

      या कार्यक्रमानंतर बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनींनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सागररत्न मत्स्य बाजारपेठेसमोर पर्यावरण बदलाविषयी विविध घटकांवर माहिती देणारे तसेच प्लॅस्टिक बंदीप्लॅस्टिकच्या अति वापराचे दुष्परिणामकांदळवन संवर्धनाचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले. उपस्थितांनी माझी वसुंधराबाबत शपथ घेतली.

      शहरातील विविध भागात ५०० वृक्षांची लागवड करण्याचे नियोजित आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

फोटोओळी – १) पर्यावरण दिनी सायकल रॅली काढण्यात आली.

         २) कॅम्प येथे शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here