Kokan: पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याास तीव्र आंदोलन – शैलेश परब

0
62
पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याास तीव्र आंदोलन - शैलेश परब
पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याास तीव्र आंदोलन - शैलेश परब

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे २०१८ मध्ये वेंगुर्ला तालुक्यातील निवती येथे पाणबुडी प्रकल्प मंजूर झाला. २०१९ मध्ये सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे अर्थराज्यमंत्री असताना बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता गुजरात येथे नेण्याचा घाट घातला जात असून तसे झाल्यास उबाठा शिवसेनेतर्फे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे संफ प्रमुख शैलेश परब यांनी दिला.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-मंगल-कलशाच-2/

 वेंगुर्ला येथील तालुका संफ कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी श्री.परब बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, बाळा गावडे, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, शहरप्रमुख अजित राऊळ, सावंतवाडी उपतालुका प्रमुख आबा सावंत, हिमांशू परब उपस्थित होते.निवडी येथील पाणबुडी प्रकल्पामुळे ५ हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपाच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प येथेच होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणबुडी प्रकल्प जर झाला नाही तर जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. परब यांनी दिली.

फोटोओळी – वेंगुर्ला येथील पत्रकार परिषदेत शैलेश परब यांनी माहिती दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here