Kokan: प्रा.यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १२ जानेवारीपासून

0
47
प्रा.यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १२ जानेवारीपासून
प्रा.यरनाळकर स्मृती एकांकिका स्पर्धा १२ जानेवारीपासून

वेंगुर्ला प्रतिनिधी- कलावलय वेंगुर्ला आयोजित व बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १२ ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह कॅम्प-वेंगुर्ला येथे रोज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-रवळनाथ-व-परिवार-देवत/

स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, उत्तेजनार्थ दोन संघांना प्रत्येकी १ हजार व कायम स्मृतिचिन्हे तसेच वैयक्तिक स्त्री-पुरूष अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक अंगे यांतील प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येक १ हजार, ७००, ५०० व स्मृतिचिन्हे देण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश फी ५०० रू. असून प्रथम येणाऱ्या १५ संघांनाच प्रवेश दिला जाईल. नावनोंदणीसाठी कलावलय अध्यक्ष बाळू खांबकर (९४२२०५५०३९) यांच्याशी संफ साधावा. या एकांकिका स्पर्धांसाठी रसिक प्रेक्षकांना प्रत्येक दिवसाला २० रूपये एवढी प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here