Kokan: बाल कला-क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला नं.३चे यश

0
73
बाल कला-क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला नं.३चे यश
बाल कला-क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला नं.३चे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- नुकत्याच पार पडलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा महोत्सवामध्ये वेंगुर्ला शाळा नं.३च्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात यश संपादन केले. साईराज विनय सामंत व श्रीनिवास बाबुराव मयेकर यांनी ‘ज्ञानी मी होणार‘ मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.https://sindhudurgsamachar.in/kokan-प्रत्येक-गावात-ई-केवायसी/

याच शाळेतील दिया दिलीप मालवणकर हिने ५० मिटर धावणे व लांब उडीमध्ये लहान गटात प्रथम, मान्यता संदिप पेडणेकर हिने उंच डीमध्ये मोठ्या गटात प्रथम, सर्वेश विकास मेस्त्री याने लांब उडीमध्ये मोठ्या गटात प्रथम, रिले मोठ्या गटात प्रथम, खो-खो मोठ्या गटात मुलगे प्रथम. या सर्वांना संदिप पेडणेकर, विनय सामंत, दिलीप मालवणकर, अमृत काणेकर, गोविद मांजरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारूती कुडाळकर, उपाध्यक्ष बाबूराव मयकर, पालक संघ उपाध्यक्ष अमृत काणेकर, अंगणवाडी सेविका कांबळे, मुख्याध्यापक सावंत, सातपुते, राकेश देसाई, पूनम रेडकर यांनी अभिनंदन केले.

फोटोओळी – ज्ञानी मी होणार मधील विजेत्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here