
वेंगुर्ला प्रतिनिधी – सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देवगड पोंभुर्ले येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म गावी जाऊन बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कोलगेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आचार्य-बाळशास्त्री-जां/
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव पोभूर्ल आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र काढून खऱ्या अर्थाने मराठी वृत्तपत्राची चळवळ निर्माण केली त्याचबरोबर केवळ वृत्तपत्र पत्रकारिता न करता त्यांच्याकडे असलेल्या दांडपट्टा व युद्धनीतीचेही प्रशिक्षण अनेकांना दिले त्यांचा आदर्श आजही प्रत्येक पत्रकाराने घेतला पाहिजे असे उद्गागार सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कौलगेकर यांनी काढले. यावेळी पत्रकार संघाचे सचिव सचिन वराडकर व खजिनदार सावळाराम भराडकर आदी पत्रकार मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना जिल्हाध्यक्ष सुरेश कोलगेकर आदी
One attachment • Scanned by Gmail