Kokan: महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी थेट वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली

0
20
सुरंगी,
महिला भगिनींच्या शेतमालाला अर्चना घारेंनी थेट वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

वेंगुर्ला- : तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील महत्वाची वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. बुधवारी पहिली गाडी नारळ वाढवून सौ. घारे यांच्या उपस्थितीत वाशीसाठी रवाना झाली. https://sindhudurgsamachar.in/kokan-सात-उमेदवारांची-अनामत-रक/

सुरंगीच फुल व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी वाशी बाजारपेठेला रवाना झाली. येथील महिला भगिनींना रोजगार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा या हेतूने अर्चना घारे यांनी परिश्रम घेतले. याबद्दल महिलांच्या संघाकडून त्यांचे धन्यवाद मानले.

सौ. अर्चना घारे म्हणाल्या, प्रभाग संघाच्या सचिव सौ. रिया धुरी यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे शेतमालाला वाशीसारखी बाजारपेठ उपलब्ध करून देता आली. वाशीमध्ये हा माल थेट जाणार आहे. आज एक गाडी जात असली तरी भविष्यात शेकडो गाड्या येथून वाशीला जातील. माझ्या महिला भगिनी सधन व्हाव्यात हा उद्देश आहे. महिला भगिनींसाठी योगदान देता आले याचे समाधान आहे. शेतमालाला दलालाविना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. याचा आनंद आहे. अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी, राष्ट्रवादीचे आसोली गाव अध्यक्ष विक्रांत कांबळी, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, युवा अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदीसह आसोली ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here