Kokan : रास्त भाव ध्यान्य दुकान परवान्यांबाबत जाहीरनामा प्रसिध्द

0
84
रास्त भाव ध्यान्य दुकान परवाना,
रास्त भाव ध्यान्य दुकान परवान्यांबाबत जाहीरनामा प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी, दि. 2 (जि.मा.का.) :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 च्या कलम 12 (2)(ई) मधील तरतूद पुढीलप्रमाणे आहे. पंचायती, स्वयंसहाय्यता गट, सहकारी संस्था यांसारख्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यासांना रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यास प्राथम्य देणे आणि महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे दुकानांचे व्यवस्थापन करणे. सध्याची रास्त भाव दुकाने/ किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेली किंवा यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन तसेच तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसिन परवाने खालील प्राथम्यक्रमानुसार मंजूर करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्हा-सैनिक-कल्याण-कार्/

रास्त भाव दुकाने मंजुरीसाठी प्राथम्यक्रम- पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था). नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था. संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास वरील प्राथम्य क्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर होणाऱ्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायांव्दारे करु शकणाऱ्या दुकान परवाने करणे आवश्यक राहील.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांसाठी केवळ रास्तभाव धान्य दुकाने परवाने व मंजुरीकरिता दि 1 जानेवारी 2024 रोजी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. रास्तभाव दुकाने परवाने मंजूरी करावयाचे तालुके व गावे पुढीलप्रमाणे, सावंतवाडी तालुक्यातील, केसरी, पारपोली, सातुळी, कोंडुरे, सावंतवाडी ई वॉर्ड, सावंतवाडी ई 1 वॉर्ड, सावंतवाडी सी वॉर्ड. दोडामार्ग तालुक्यातील, परमे, भिकेकोनाळ, कुंभवडे. वेंगुर्ला निरंक कुडाळ तालुक्यातील, मुणगी, कविलगांव, रुमडगांव, कुडाळ नं.1, आंबडपाल, कवठी, नानेली. मालवण तालुक्यातील, बांदीवडे, आंबेरी, गोठणे, मालोंड, खरारे, मालवण वॉर्ड नं.1, ओवळीये, खोटले, तारकर्ली, घुमडे. कणकवलील तालुक्यातील, कुंभवडे, ओझरम, वारगांव, तळवडे, बेळणे. देवगड तालुक्यातील, दाभोळे, गढीताम्हणे, हडपीड, लिंगडाळ, मिठमुंबरी, नाद, पाटगांव, पेंढरी, सांडवे. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी, वेंगसर या गावातील,क्षेत्रातील पंचायत बचत गट, सहकारी संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या दिलेल्या कागदपत्रांसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयात दाखल करावेत.

⭐अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्र/अटी व शर्ती

१)अर्जाचे कोरे नमुने रक्कम रु. १०/- तहसिलदार कार्यालयात जमा केल्यावर संबंधित तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेतून उपलब्ध होतील. २) अर्जदार ज्या गावातील परवान्यासाठी अर्ज सादर करणार आहे त्याच गावातील/क्षेत्रातील रहिवासी असावा. ३) विहीत केलेल्या दिनांकापूर्वी प्राप्त झालेल्या अर्जाचाच छाननीसाठी विचार केला जाईल. विहीत दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. यासाठी संबंधित तहसिलदार यांनी अर्जदार यांस पोहोच देऊन अर्जावर दाखल तारीख घालावी. ४) अर्जावर संस्था प्रमुख व संस्थेचे सचिवाची सही असणे आवश्यक आहे.५) अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.
५(अ) अर्जदार जेव्हा ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा – १. ग्रामपंचायत/तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था असेल तेव्हा ग्रामसभा/ग्रामपंचायत ठरावाची प्रत. २. सर्व सदस्यांचे निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, त्यांचे नावाचे यादीसह. ३. ग्रामपंचायत/तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था यांचे आर्थिक व्यवहार व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा/बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत. ४. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ / सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. ५. किरकोळ केरोसिन परवान्यासाठी अर्ज करताना, केरोसिन साठविण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
५(ब) अर्जदार जेव्हा नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट असतील तेव्हा – १. स्वयंसहाय्यता बचत गट अस्तित्वात व कार्यरत असल्याबाबत संबंधित प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अथवा संबंधित गटविकास अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र. २. स्वयंसहाय्यता बचत गटातील सर्व सदस्यांची यादी व शैक्षणिक पात्रता दर्शविणारा पुरावा. ३. स्वयंसहाय्यता बचत गटाचे सभासद दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याबाबतचा पुरावा. ४. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या आर्थिक व्यवहारांचे हिशोब व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा. मागील ३ वर्षांचे ताळेबंद व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत. ५. स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र ६. स्वयंसहाय्यता बचत गट किंवा स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य-पदाधिकाऱ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल नसलेबाबत स्वयंसहाय्यता बचत गटाचे स्वयंघोषणापत्र. ७. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या नावे अन्यत्र कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. ८. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी/बांधकामाच्या वैधतेसंबंधी/इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा/केंद्रशासनाच्या काय‌द्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. ९. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जागेतील शिधावाटप दुकान केरोसिन परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. १०. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. ११. संबंधित ग्रामपंचायतीचा स्वयंसहाय्यता बचत गटाने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. १२. सभासदांना वाटप केलेल्या कर्जाच्या तपशिलाबाबत सद्यस्थितीदर्शक पुरावा.१३. स्वयंसहाय्यता बचत गटाकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा. १४. स्वयंसहाय्यता बचत गटाने/सदस्यांनी बँकेकडून कर्ज घेतले असल्यास, सदर कर्ज हप्ते परत फेडीबाबतच्या सद्यस्थितीचा पुरावा. १५. स्वयंसहाय्यता बचत गटाकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायांबाबत माहिती. १६. स्वयंसहाय्यता बचत गट रास्त भाव धान्य दुकान किरकोळ केरोसिन परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत बचत गटाच्या सदस्यांचा ठराव. १७. रास्त भाव धान्य दुकान परवाना मिळाल्यास स्वयंसहाय्यता बचत गट परवाना एकत्रित रित्या चालविणार असून, अन्य कोणासही परवाना चालविण्यास देणार नसलेबाबत परवाना हस्तांतरीत करणार नसल्याबाबत गटाच्या सदस्यांचे प्रतिज्ञापत्र. १८. संबंधित ग्रामपंचायतीचा स्वयंसहाय्यता बचत गटाने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. १९. किरकोळ केरोसिन परवान्यासाठी अर्ज करताना, केरोसिन साठविण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
५(क) अर्जदार जेव्हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, किंवा संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास असतील तेव्हा. १. सहकारी संस्था यातील सर्व सदस्यांची यादी. २. सहकारी कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झाल्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांचे प्रमाणपत्र. ३. संस्थेचे आर्थिक व्यवहार व लेखे अद्ययावत असलेबाबत पुरावा. मगिल ३ वर्षाचे ताळेबंद व बँकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत. ४. सहकारी संस्थेतील सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत सदस्यांचे स्वयंघोषणापत्र. ५. सहकारी संस्थेवर किंवा संस्थेच्या सदस्य-पदाधिकाऱ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसलेबाबत संस्थेचे स्वयंघोषणापत्र. ६. प्रस्तावित दुकानाच्या जागेसंबंधी/बांधकामाच्या वैधतेसंबंधी/इतर तत्सम बाबींसाठी कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचा/केंद्रशासनाच्या कायद्यांचा भंग झाल्यास दुकान विनाविलंब विनानोटीस रद्द करण्यात येईल ही अट मान्य असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. ७. परवान्याची जागा निवासी असल्यास संबंधित गृहनिर्माण संस्था अगर तत्सम प्राधिकरणाच्या निवासी जागेतील शिधावाटप दुकान/केरोसिन परवान्यासाठी नाहरकतीबाबत स्वयंघोषणापत्र. ८. ज्या ठिकाणी परवान्यानुसार दुकान चालविणार आहेत, त्या जागेच्या मालकी हक्काचा पुरावा. यात ग्रामपंचायतीकडील नमुना आठ अ । सातबारा उतारा/नगर भूमापन विभागाकडील मिळकतीचा उतारा तसेच, जागा भाडयाची असल्यास रुपये २००/- च्या स्टॅम्प पेपरवरील जागा मालकाचे संमत्तीपत्र. ९. संबंधित ग्रामपंचायतीचा सहकारी संस्थेने परवाना घेण्यास मंजूरीबाबतचा ठराव. १०. संस्थेकडे खेळते भांडवल असलेबाबत पुरावा. ११. संस्थेकडून सध्या करणेत येत असलेल्या व्यवसायांबाबत माहिती.१२. संस्था रास्त भाव धान्य दुकान परवाना चालविण्यास इच्छुक असलेबाबत सहकारी संस्थेच्या सदस्यांचा ठराव. १३. किरकोळ केरोसिन परवान्यासाठी अर्ज करताना, केरोसिन साठविण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

सदरचा जाहीरनामा शासन निर्णय व शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून तसेच या कार्यालयाकडील उपलब्ध माहितीच्या आधारे प्रसिध्द करण्यात येत आहे. माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास सदरचा जाहीरनामा कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याबाबतचे अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here