Kokan: रेडी समुद्रात रेड टीमला पकडण्यात यश

0
21
सिंधुदुर्ग
रेडी समुद्रात रेड टीमला पकडण्यात यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- सागर कवच अभियाना अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे मार्फत १६ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव व इतर अंमलदार यांच्यामार्फत सतर्क पेट्रोलिंग करून रेडी येथील समुद्रात रेड टीमला पकडण्यात यश आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सागर-सुरक्षा-कवच-मोहिमेन/

गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सागर कवच मोहीम राबविण्यात आलेली होती. त्यामध्ये वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात येत होती. सायंकाळी रेडी पोर्ट जेटी येथे ‘अनिल कृपा‘ या बोटीवरील  रेड टीमला यशस्वीरित्या पकडण्यात आलेले आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे याही उपस्थित होत्या.

फोटोओळी – पोलिसांनी रेड टीमला पकडून ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here