Kokan: लांजा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल १३ ग्रामपंचायतींवर शिवसेना (ठाकरे गट) गटाने वर्चस्व!

0
56
election 2024
भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.

लांजा प्रतिनिधी – राहुल वर्दे

तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल १३ ग्रामपंचायतींवर शिवसेना (ठाकरे गट) गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. दोन ग्रामपंचायती भाजपाकडे तर चार ग्रामपंचायती गावविकास पॅनलच्या ताब्यात राहिल्या.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-भाजपच्या-ताब्यात-असलेल/

लांजा तालुक्यात खावडी आणि वेरवली खुर्द या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. एकूण १९ ग्रामपंचायतींच्या १५३ जागांपैकी ९९ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले होते. तर सरपंचपदांच्या १७ जागांसाठी ४१ उमेदवार तर सदस्यपदांच्या ५२ जागांसाठी १०३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. थेट जनतेतून निवडून द्यावयाच्या असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीची मंगळवारी २० डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. यामध्ये शिवसेनेकडे कुरचुंब, वेरवली खुर्द, खावडी, सालपे, कोंडगे, वाकेड, रुण, बेनी बुद्रुक, वाघ्रट, आगवे, खानवली, भडे, पुनस या ग्रामपंचायती तर गावविकास पॅनलच्या ताब्यात निवसर, वेरळ, कुर्णे, तळवडे आणि भाजपाकडे कोट,आरगाव या दोन ग्रामपंचायती गेल्याचे स्पष्ट झाले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-ग/

नेहमीप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. तालुक्यात शिवसेनेबरोबरच गावपॅनल, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस यानिमित्ताने पहायला मिळाली. खरी लढत ही शिवसेना आणि गाव पॅनल यांच्यातच झाली. सरपंचपदाचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.
खावडी -रुपाली कृष्णा आंब्रसकर – (शिवसेना),
वेरवली खुर्द – सुनिल बाळकृष्ण खुलम (शिवसेना),
तळवडे- रोहिणी चंद्रकांत आंबेकर (गावपॅनल),
कुरचुंब – प्रसाद द्वारकानाथ माने – (शिवसेना),
सालपे – पुजा परीमल कांबळे – (शिवसेना)
आरगाव – शमिका शैलेश खामकर (भाजपा),
कोंडगे – सिताराम विश्राम कदम (शिवसेना),
वाकेड – संदीप महादेव सावंत (शिवसेना),
बेनी बुद्रुक – परेश यशवंत खानविलकर – (शिवसेना)
वाघ्रट – अनंत गणपत घवाळी- (शिवसेना),
आगवे – प्रफुल्ल चंद्रकांत कांबळे (शिवसेना),
रुण सुहास शंकर साखरकर -(शिवसेना)
भडे – सदिच्छा सचिन नवाथे – (शिवसेना)
खानवली – गणपत गंगाराम मांडवकर-(शिवसेना),
कोट – निशिगंधा नंदकुमार नेवाळकर (भाजपा),
कुर्णे – मानसी मंगेश माने -(गावपॅनल),
पुनस – संतोष नारायण लिंगायत (शिवसेना)
निवसर – अर्चना राजेश कांबळे – (गावपॅनल)
वेरळ – सुवर्णा राहुल जाधव (गावपॅनल)
हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले.

तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी खावडी मधून स्वप्नाली पिलके, शितल पिलके, सचिन पिलके, ऋतुजा गुरव, जयेश गुरव, वैशाली कोतवडेकर, विघ्नेश गुरव.

पुनस मधून कांबळे सावंत अनिता शिंदे मनोहर कदम, नेत्रा पांचाळ, स्नेहल यादव, प्रमोद गुरव.

कुर्णे मधून राजाराम गुरव आकांक्षा खामकर संदीप घाग, दिपाली पडये, अंजली पडये, अनंत दाभोळकर, पुनम घडशी, सपना पांचाळ, दिलीप पांचाळ.

कोट मधून उमेश कांबळे, रवींद्र नारकर, कल्याणी भिसे, कृषी अग्रे, संयोगी दरडे, विलास कांबळे, ममता जोशी, निकिता मांडवकर, हंसराज सुर्वे.

खानवली मधून रोशनी सातोपे, अर्चना खानविलकर, वाघोजी खानविलकर, वंदना सुर्वे, चंद्रकला घोडेकर, संजय कालकर, प्रदीप गार्डी, सायली धावडे, विनायक कालकर.

वाकेड मधून संदीप सावंत, स्नेहल पांचाळ, चंद्रकांत साळवी, गणेश चव्हाण, संयुक्ता शेट्ये, गौरी शेट्ये, लक्ष्मी बराम, स्नेहल मटकर, केशव भितले.

रूण मधून जयश्री सरवंदे, जानू झोरे,अनिल शिंदे, दीप्ती तिर्लोटकर, मानसी पुरोहित, रमेश जाधव, उमेश मांडवकर, विजया कांबळे, स्वाती खावडकर.

कोंडगे मधून ज्योती काटकर, अपेक्षा कदम, अमर चव्हाण, रत्नमाला जाधव, मारुती विश्वासराव, पुंडलिक बेर्डे, रसिका सावंत.

वेरळ मधून भारती जाधव, शरद चरकरी, इकबाल टोले, रूपाली पानकर, सयजीन टोले, मंगेश डाकवे, समीक्षा पाताडे ,श्रावणी जाधव, महेश गुंडये.

निवसर मधून प्रज्ञा कांबळे, वनिता कांबळे, सुरेश जयराम शिंदे, सुवर्ण आग्रे, सुरेश विश्राम शिंदे, जोतस्ना भोसले, इम्रान पावसकर.

भडे मधून राजेंद्र दळवी, संजना बंडबे, जयश्री तोस्कर, सुहासिनी लोखंडे, ज्ञानेश रेवाळे, सेजल तेंडुलकर, मंगेश खर्डे.

आगवे मधून मेघना जोशी, पूजा जोशी, सतीश मांडवकर, योगेश कांबळे, दत्ताराम जोशी, मैत्री रायकर, मनस्वी मोरे, पूजा गुरव, हरिश्चंद्र बेंद्रे.

वाघ्रट मधून सिद्धी शिंदे, निलेश पाष्टे, लावण्या पत्याणे, श्रीकांत तरळ, मयुरी पत्याणे, पंकज पत्याणे.

सालपे मधून अलका महाडिक, पांडुरंग साळुंखे, ज्योती माजलकर, शुभांगी कांबळे, सुप्रिया जाधव, संतोष जाधव, जयश्री पाटील, यशवंत घाग, संकेत घाग.

आरगाव मधून ज्योती आमटे, प्रेरणा यद्रे, रवींद्र चिबडे, प्रियंका खामकर, शैलेश खामकर, स्वानंद कदम,कविता पांचाळ.

कुरचुंब मधून वर्षा माने, मिलिंद माने, आदिती मांडवकर, सूर्यप्रकाश गुरव, तृप्ती सुवारे, अनिल सुवारे.

बेनी बुद्रुक मधून नेहा केळकर, दिपाली खानविलकर, संदीप बने, सुरेखा खानविलकर, अशोक कोंडस्कर, सारिका पेंडणेकर, प्रज्योत खानविलकर.

तळवडे मधून प्रसाद ढेपे, अनुष्का चव्हाण, नीलम पाटोळे, आकांक्षा कदम, उस्मान मालदार, श्वेता आंबेकर, योगेश पाटोळे.

वेरवली खुर्द मधून श्रेया पडवणकर, वैष्णवी प्रिंदावणेकर, सुरज कुरतडकर, स्वराज जाधव, श्राविका चव्हाण, महेश शिंदे, अनिल मांडवकर, प्रतिगंधा कदम, भगवान राणे असे सदस्य पदी निवडून आलेल्यांची नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here