Kokan: वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग : हजारोंचे नुकसान

0
47
खरेदी विक्री संघाला आग
अचानक लागलेल्या आगीत खरेदी विक्री संघाचे नुकसान झाले.

वेंगुर्ला प्रतिनिधी– वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला आज रविवारी पहाटे 4.30 वाजता वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सप्ताहाच्या-माध्यमातून/

दरम्यान जागरूक नागरिकांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. नंतर वेंगुर्ला नगरपरिषदचा अग्निशमन बंब आल्यानंतर पूर्ण आग विझविण्यात आली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.आज पहाटे 4.30 च्या दरम्याने वेंगुर्र्ला खरेदी विक्री संघात जिथे खत विक्री होते त्या ठिकाणी अचानक आगीने पेट घेतला. त्या दरम्यान ज्येष्ठ भजनी बुवा विजय गुरव पहाटेची काकड आरती करण्यास जात असताना त्यांना आग लागल्याचे दिसून आले.

त्यांनी तत्काळ शेजारी रहाणा-या मोर्डेकर व समोर रहाणारे नाईक कुटुंबियांना उठवले तसेच अग्नीशमन बंब व पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत राहूल मोर्डेकर, ओंकार मोर्डेकर, वृंदा मोर्डेकर, विजय गुरव, निखिल घोडगे यांनी तसेच अमित नाईक, कुणाल नाईक, प्रकाश नाईक यांनी आपल्या घरातून पाण्याचे पाईप जोडून पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्या -साठी प्रयत्न सुरू केले. राहूल मोर्डेकर याने जीवाची पर्वा न करता शटर तोडून आत प्रवेश केला आणि पाणी मारले. त्यानंतर बंब आल्यानंतर पहाटे 5.30 पर्यंत आग पूर्णत: विझविण्यात यश आले.
फोटोओळी – अचानक लागलेल्या आगीत खरेदी विक्री संघाचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here