Kokan: वेंगुर्ला येथे सचिन वालावलकर मित्रमंडळाची स्थापना

0
32
sachin Walavlakar mitrmandal
वेंगुर्ला येथे सचिन वालावलकर मित्रमंडळाची स्थापना

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत सचिन वालावलकर मित्रमंडळाची स्थापना करण्यात आली असून याच्या अध्यक्षपदी संतोष परब यांची नियुक्ती केली आहे. लवकरच या मंडळाची उर्वरित कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-खरेदी-विक्री-स/

या बैठकीला अॅड.मनीष सातार्डेकर, जयेश गावडे, बाळा आरावंदेकर, सागर शिरसाट, प्रशांत सावंत, बाबू टेमकर, हेमंत नाईक, भूषण माडकर, लवू गावडे, शैलेश केसरकर, जयंत सावंत, सुचित सावंत, संदेश रेडकर, मनीष कोळेकर, सुचित परब, सोहम आडेलकर आदी उपस्थित होते.  

मित्रमंडळच्या माध्यमातून मी आपल्या पाठीशी राहीन आणि तुमच्या मार्फत नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. वेंगुल्र्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त शासकीय निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील असे संतोष परब यांनी सांगितले. तर मंडळामार्फत चांगले उपक्रम राबवूया असे आवाहन सचिन वालावलकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here