Kokan: वेंगुर्ले तालुक्यात मतमोजणी प्रक्रिया शांततेत; 23 पैकी 13 ग्रामपंचायतींवर भाजपाचे सरपंच विजयी

0
41
मेढा ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत अवधूत रेगे हे विजयी

वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत निवणूक मतमोजणीच्यावेळी मेढा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे उमेदवार विनायक खवणेकर व अवधूत रेगे यांना २२२ ही समान मते पडल्याने चिठ्ठी काढून उमेदवार निवडण्यात आला. ओवी काळसेकर या विद्यार्थीनीच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीच्या निकालात अवधूत रेगे विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले

वेंगुर्ले :प्रतिनिधी 

वेंगुर्ली तालुक्यात जाहीर झालेल्या एकूण २३ ग्रामपंचायतींपैकी १३ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. तर शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ५ ग्रामपंचायतींवर दावा करण्यात आला असून उर्वरित ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेल्याचे चित्र आहे. गेले एक महिना निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रयत्न करत प्रत्येक गावात आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे तर काही ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत.

परबवाडा ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचांसह सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या नुतन लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जल्लोष केला.

परबवाडा, रेडी, परुळेबाजार,  कुशेवाडा, तुळस आदी ठिकाणी भाजपाने आपले गड राखले आहेत. तसेच आसोली, पाल, अणसुर,पालकरवाडी, वेतोरे, आडेली, मठ, चिपी आदी ग्रामपंचायत वर आपल्या पक्षाचे सरपंच विराजमान झाल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर यांनी सांगितले.

तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी मेढा, होडावडा, भोगवे, कोचरा, म्हापण आदी ठिकाणी आपल्या पक्षाचे सरपंच विराजमान झाल्याचे सांगितले. तर उर्वरित शिरोडा, उभादांडा, वजराट, दाभोली, केळुस ग्रामपंचायत या महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत.

वेंगुर्ले तहसील कार्यालयात दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक निकालाची प्रक्रिया सुरू होती. तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच निकाल जाहीर होणार याकडे कटाक्षाने लक्ष दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौजफाटा तयार ठेवण्यात आला होता.

मेढा सरपंच– अवधूत रेगे-२२२ (वि.), सदस्य – नमिता घाटवळ (बिनविरोध), प्रज्योत मेतर-१०२(वि.), प्राजक्ता निवतकर-२३५(वि.), विठोबा जाधव (बिनविरोध), शितल पाटकर (बिनविरोध), प्रकाश खोबरेकर (बिनविरोध), अमिषा आमडोस्कर (बिनविरोध), गुरुष्का कोचरेकर (बिनविरोध)

कुशेवाडा सरपंच-निलेश सामंत-५५९(वि.), सदस्य -श्रृतिका केसरकर-१४८(वि.), रोहिणी परब-१६४(वि.), महादेव  सापळे-१५४(वि.), वैभवी माडये-१४१(वि.), सानवी देसाई-१३५(वि.), गणपत माधव-१४२(वि.), अनंत माडये-२१२(वि.), प्राजक्ता कदम-१९१ (वि.), विठोबा  राणे-२०७(वि.)

कोचरा सरपंच-योगेश य.तेलीकोचरेकर-७११(वि.), सदस्य -प्रगती दि.राऊळ (बिनविरोध), संजय वि.गोसावी (बिनविरोध), स्वरा सं.हळदणकर (बिनविरोध)

गुरुनाथ प्र. शिरोडकर-३९४(वि.), विशाल दा.वेंगुर्लेकर (बिनविरोध), उर्मिला ल.खडपकर-३०५(वि.), सुनिता सुनिल परब-२४१(वि.)

दाभोली सरपंच – उदय गोवेकर-३८०(वि.), सदस्य – एकनाथ राऊळ-२०३(वि.), सुशांत परब-१८५(वि.), फिल्सुअनिता फर्नांडीस-१८२(वि.), अवधूत राऊत-१८२(वि.), स्वरा दाभोलकर (बिनविरोध), अर्चना दाभोलकर (बिनविरोध), जयंती पवार (बिनविरोध), श्रीकृष्ण बांदवलकर-२२३(वि.)

आडेली सरपंच-यशस्वी कोंडसकर-११२६(वि.), सदस्य – पल्लवी धुरी-२७५ (वि.), गायत्री  परब-२७५(वि.), जयवंत वराडकर-२८८ (वि.), प्रतिभा  धर्णे-३७९(वि.), सानवी कोंडसकर-४०४(वि.), परेश हळदणकर-३९४(वि.), वर्षा आडेलकर-२१२(वि.), नारायण कोंडसकर-२७८(वि.), प्रमोद गवळी-२५२(वि.), सुधीर धुरी -२६८(वि.), भुमिका  सावंत-२५१(वि.)

आसोली सरपंच-मोहन जाधव-३३७(वि.)सदस्य -राकेश धुरी-३२५(वि.) शितल घाडी, तुकाराम कोंबे, प्राजक्ता जाधव, राखी धुरी, संकेत धुरी, रति नाईक, नेत्रा ना.राणे (सर्व बिनविरोध)

भोगवे सरपंच-अंकिता वायंगणकर-४३७(वि.), सदस्य-रुपेश  मुंडये-२६६(वि.), मनाली गायकवाड (बिनविरोध), सूर्यकांत केसरकर (बिनविरोध), आरती कोळंबकर-१७७(वि.), सुनिल राऊत-१४४(वि.), प्रणाली पाटकर-१३५(वि.), उल्का कोळंबकर-१४५(वि.), मिलिद सामंत-१२९ (वि.)

होडावडा सरपंच -रसिका केळुसकर-७७५(वि.), सदस्य -अमृता साळगांवकर-२८२(वि.) शैलजा साळगांवकर-२८७(वि.), राजबा सावंत-२८४(वि.), संदिप सातार्डेकर-२३९(वि.), विनया दळवी-२३० (वि.), अर्जुन  दळवी-२३०(वि.), मनिषा  जाधव-२८३(वि.), अनन्या धावडे-२८२(वि.), अरविद नाईक-२७१(वि.)

वेतोरे सरपंच-प्राची नाईक (बिनविरोध), सदस्य -तुषार नाईक (बिनविरोध), संतोषी गावडे-२०७-(वि.), विनायक गावडे-२०९(वि.), सुजाता चं.वालावलकर (बिनविरोध), संगिता सं. नाईक-२१९(वि.), विक्रम वि. सावंत-२२१(वि.), साक्षी ग.राऊळ, सीता रा.शिरोडकर (बिनविरोध), प्रकाश म. गावडे-२११(वि.)

अणसूर सरपंच-सत्यविजय गावडे-३४०(वि.), सदस्य वैभवी मालवणकर (बिनविरोध), प्रज्ञा गावडे (बिनविरोध), साक्षी गावडे (बिनविरोध), संयमी गावडे (बिनविरोध), वामन गावडे-८९(वि.), सिमा गावडे (बिनविरोध), सुधाकर  गावडे-१२६(वि.)

म्हापण सरपंच-आकांक्षा चव्हाण-८००(वि.),सदस्य -सुषमा म्हापणकर-२१९(वि.), अविनाश खोत-१६७(वि.), गुरुप्रसाद चव्हाण-१८९(वि.), सिया मार्गी-२५०(वि.), श्रीकृष्ण ठाकूर-२४७(वि.), प्रशांती कोनकर-१७२(वि.), अभय ठाकूर-१७४(वि.)

चिपी सरपंच-माया माडये-२१९(वि.),सदस्य -माधवी सरमळकर-११०(वि.), भुमिका पवार-१०४(वि.), प्रदिप सारंग-१३१(वि.), भाग्यश्री सावंत (बिनविरोध), प्रकाश चव्हाण-११३(वि.), मोहिनी वाक्कर (बिनविरोध), गोपाळ दुखंडे-३६ (वि.),

केळुस सरपंच-योगेश शेटये-४१७(वि.),सदस्य -लक्ष्मण वराडकर (बिनविरोध), मानसी कुडव (बिनविरोध), महेश नागवेकर (बिनविरोध), सुशम मसुरकर (बिनविरोध), सुभाष साटम-१७९(वि.), दिप्ती मुणनकर (बिनविरोध), अक्षया केळुसकर (बिनविरोध), संजिव प्रभू-१२५(वि.)

मठ सरपंच-रुपाली नाईक-८१२(वि.),सदस्य – संतोष वायंगणकर-२४२(वि.), सिद्धी गावडे-२९०(वि.), महादेव गावडे-२९८(वि.), नम्रता बोवलेकर (बिनविरोध), शमिका मठकर-३३९(वि.), नित्यानंद शेणई-३९६(वि.), सोनिया मठकर (बिनविरोध), शमिका धुरी-२५७(वि.), महेश सावंत-२३२(वि.)

पालकरवाडी सरपंच-सदशिव पाटील-५१२(वि.),सदस्य – विकास अणसूरकर-१९४(वि.), दर्शना पालकर-२४२(वि.), संगिता परब-२२६(वि.), दिनकर पालव-२३२(वि.), दिपक मोहिते-२३४(वि.), शुभदा गोसावी (बिनविरोध), नंदिता शेर्लेकर (बिनविरोध), यशवंत कापडी-११८(वि.)

परबवाडा सरपंच-शमिका बांदेकर-४९५(वि.), सदस्य -अरुणा गवंडे-२५८(वि.), कार्तिकी पवार-२४४(वि.), विष्णू परब-२४७(वि.), स्वरा देसाई-१०७(वि.), कृष्णाजी सावंत-१०७(वि.), सुहिता हळदणकर-१११(वि.), हेमंत गावडे-१२९(वि.)

परुळेबाजार सरपंच-प्रणिती आंबडपालकर-७३५(वि.), सदस्य – प्राजक्ता पाटकर-३४०(वि.), सीमा सावंत-२८५(वि.), प्रदिप प्रभू-२७३(वि.), नमिता परुळेकर-२१९(वि.), तन्वी दुधवडकर-१९५(वि.), संजय दुधवडकर-१८३(वि.), अभय परुळेकर-२११(वि.), पुनम परुळेकर-२०३(वि.), सुनाद राऊळ-२०९(वि.)

वजराट सरपंच-अनन्या पुराणिक ५४३(वि.), सदस्य – रसिका मेस्त्री-२१३(वि.), नामदेव कांदे-१९१(वि.), प्रविण कांदे-१८३(वि.), श्यामसुंदर पेडणेकर-१८३(वि.), दिपिका राणे-१९२(वि.), प्रियांका केरकर-१९६(वि.)

तुळस सरपंच-रश्मी परब-९२१(वि.), सदस्य-अर्पणा गावडे-३९०(वि.), विनिता शेटकर-३८७(वि.), सचिन नाईक-४१३(वि.), जयवंत तुळसकर-३४१(वि.), रतन कबरे-४२९(वि.), चरित्रा परब-३८९(वि.), मयुरी बरागडे-२७७(वि.), नारायण कोचरेकर-१७७(वि.), स्वाती सावंत-२८४(वि.), नारायण कुंभार-३२९, रमाकांत ठुंबरे-२२७(वि.) 

शिरोडा सरपंच-लतिका रेडकर-९८१(वि.), सदस्य- प्रथमेश बांदेकर (बिनविरोध), अनन्या घाटवळ (बिनविरोध), सुधीर नार्वेकर (बिनविरोध), पांडुरंग नाईक-१९७(वि.), रश्मी डिचोलकर-३१०(वि.), शितल नाईक-२४९(वि.), नंदिनी धानजी-३५३(वि.), प्रथमेश परब-२१९(वि.), राजन धानजी-१९८(वि.), अनिस्का गोडकर-३१६(वि.), हेतल गावडे-२८०(वि.), चंदन हाडकी-२८५(वि.), अर्चना नाईक-३१६(वि.), जयमाला गावडे-३१४, मयुरेश शिरोडकर-३१७

उभादांडा सरपंच-निलेश चमणकर-१३६०(वि.), सदस्य- देवेंद्र डिचोलकर-४०७(वि.), अस्मिता मेस्त्री-४७१(वि.), नम्रता कुर्ले-३३७(वि.), देवदत्त जुवलेकर-३०१(वि.), निरंजन साळगांवकर-३१९(वि.), कोलेस्तीन आल्मेडा-३३५(वि.), गणेश चेंदवणकर-२६२(वि.), बळीराम कुबल-२९१(वि.), अंकिता केरकर-४२१(वि.), तेजश्री कुबल-३५७(वि.), राधाकृष्ण पेडणेकर-२१३(वि.), दिपाली नवार-३३४(वि.), राजश्री मर्ये-३६०(वि.)

रेडी सरपंच-रामसिग राणे-१४५४(वि.), सदस्य- सागर रेडकर-३६१(वि.), सोनाली कलच्यावकर-३२२(वि.), नमिता नागोळकर-३७५(वि.), स्वप्निल राणे-१४५(वि.) रिचा सावंत-२७६(वि.), रश्मी रेडकर-३७६(वि.), तुळशीदास भगत-१९४(वि.), शमिका नाईक-२१०(वि.), श्रीकांत राऊळ-२०७(वि.), प्रज्ञा राऊळ-३२३(वि.), लक्ष्मीकांत भिसे-४६७(वि.), विनोद राणे-३५५(वि.), मानसी राणे-३४२(वि.)

फोटोओळी – १) मेढा ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत समान मते पडल्यानंतर चिठ्ठीद्वारे काढलेल्या निवडीत अवधूत रेगे हे विजयी ठरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रेगे यांचे पुष्पहार घालून जल्लोष केला. 

२) परबवाडा ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचांसह सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. 

३) मठ ग्रामपंचायतीच्या नुतन लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जल्लोष केला.

छाया सुरेश कौलगेकर वेंगुर्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here