ठाकरे गटाचे दोन, शिंदे गटाचा एक सरपंच विराजमान
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील निवडणूक झालेल्या ११ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल मंगळवारी लागला आहे.
यापैकी नेर्ले, हेत, उंबर्डे, नापणे, करुळ, सडुरे, कुर्ली, नानिवडे या ८ ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान झाले आहेत https://sindhudurgsamachar.in/maharashtra-२६५१-ग्रामपंचायतीवर-मह/
तर कोळपे, तिरवडे तर्फ खारेपाटण या २ ग्रामपंचायतीवर शिवसेना ठाकरे गट, तसेच नावळे ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचे सरपंच विराजमान झाले आहेत. तर अगोदर ६ बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती पैकी जांभवडे, तिथवली, अरुळे, निमअरुळे, उपळे या ५ भाजप तर गडमठ ग्रामपंचायत ही ग्रामविकास पॕनलने ताब्यात घेतली आहे.